Sunday, June 1, 2025
जिल्हा परिषद गैरव्यवहार प्रकरण फरार आरोपीला पावणेदोन महिन्यांनंतर अटक
जिल्हा परिषद गैरव्यवहार प्रकरण फरार आरोपीला पावणेदोन महिन्यांनंतर अटक...

अलिबाग : कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून अलिबाग बालविकास सेवा योजना, रायगड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भ्रष्टाचारातील आरोपी कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर याला पावणेदोन महिन्यांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर या प्रकरणातील ३ आरोपी अद्याप फरार आहेत.


पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो. पगार व पगारव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात आले आहेत. याच बाबीचा आरोपींनी उचलून जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग तसेच अलिबाग एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने यापूर्वी फेटाळले आहेत. याप्रकरणातील आरोपी महेश मांडवकर यास अटक करून देण्यात काली आहे. तर या गुन्ह्यातील ८० लाख ७८ हजार ९९२ इतकी रक्कम महेश मांडवकर याने त्याचे नातेवाईक जयेश मांडवकर, राजेश नाईक, लता नाईक यांच्या बॅंक खात्यात जमा केली होती. या तिनही नातेवाईकांचे अटकपुर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले असून हे तिन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx