Sunday, June 1, 2025
जिल्हा रुग्णालय नूतन इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न
जिल्हा रुग्णालय नूतन इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न...

अलिबाग : रायगड जिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारत भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला. जिल्हा रुग्णालयाची नूतन इमारत सात माजली उभारण्यात येणार असून, या इमारतीत अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी १५० कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाच्या इमारतीचे बांधकाम १९८० मध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे ही इमारत मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली आहे. यामुळे नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. नवीन रुग्णालय सुविधांसह एकूण ३०० खाटांचे असणार आहे. सध्याच्या जागेतच ही २ लाख चौरस फूट सात मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या मानांकनानुसार खूप अद्ययावत असे रुग्णालय उभे राहणार आहे. पाच लिफ्ट आणि दोन जिने असणार आहेत. मोठे २० खाटांचे डायलिसिस सेंटर, १६ खाटांचे आयसीयू विभाग, अपघात विभाग, अपघात विभागासाठी एक स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, पाच स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ३२ बेडचे बाल रुग्ण विभाग नूतन इमारतीत असणार आहे.

नूतन इमारतीचे भूमिपूजन सोहळा बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx