अलिबाग : रायगड जिल्ह्यात 15 नव्या एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. अलिबाग, पेण व महाड आगारांना प्रत्येकी पाच एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रायगड एसटी प्रेमींच्या मागणीची दखल घेत शासनाने नव्या एसटी बसेस दिल्या आहेत.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, महाड, माणगाव व श्रीवर्धन ही सात एसटी बस आगार आहेत. जिल्ह्यात ४३९ एसटी बसेस आहेत. त्यात २६० सीएनजी बसचा समावेश आहे. अलिबागसह पेण आगारात सीएनजीवर चालणारी एसटी बसेस आहेत. दरम्यान, एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, जून्याच गाड्यांच्या भरोवश्यावर जिल्ह्याचा कारभार चालत असल्यामुळे जून्या गाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना त्रास होत होता.
रायगड जिल्ह्यात नवीन १५ एसटी बसेस देण्यात आल्या आहेत. अलिबाग, महाड व पेण आगारात प्रत्येकी ५ एसटी बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता ४५४ इतक्या एसटी बसेस असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx