अलिबाग : रायगड जिल्ह्यात हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात २२ ठिकाणी स्वागत यात्रा तर २ मोटारसायकल रॅली काढण्यात आल्या. या स्वागत यात्रेत ढोल ताशांच्या गजरात, लेझिम पथक पारंपरिक नृत्य सादर करीत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. तसेच पारंपरिक व ऐतिहासिक पोशाख करीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. याच बरोबर घरा घरावर गुढी उभारत नववर्षाचे स्वागत केले.
गुढीपाडव्या निमित्त घरोघरी मंगलमय वातावरण होते . सकाळी दारात गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले . पुरणपोळी तसेच कडुनिंब व गुळ यांचा नैवेद्य दाखवण्यात आला . दुपारच्या जेवणात श्रीखंडपुरीचा बेत होता . जिल्हयात सर्वत्र नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आल्या . ढोलताशे , लेझीम पथक तसेच पारंपारीक देखाव्यांबरोबरच ऐतिहासिक देखावे असलेले चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .
पूजेसाठी लागणारया झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी होती . नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी मोठया प्रमाणावर झाली . सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफी पेढयांवर गर्दी होती . तर दुचाकी , चारचाकी वाहने यांचे बुकींग आधीच करून पाडव्याच्या दिवशी ही वाहने घरी आणण्यात आली . टीव्ही फ्रीज यासारख्या घरगुती वापराच्या वस्तूंच्या दुकानात देखील खरेदीसाठी गर्दी होती . अनेकांनी आपला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx