Sunday, June 1, 2025
जिल्ह्यात ४ कोटी २९ लाख बल्क लिटर मद्य विक्री
जिल्ह्यात ४ कोटी २९ लाख बल्क लिटर मद्य विक्री...

अलिबाग : पीनेवालों को पीने का बहाना चाहिए असं म्हटलं जातं, यामुळे मद्य उत्पादन शुल्कात कितीही वाढ झाली तरी मद्य पिणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षभरात ४ कोटी २९ लाख ६० हजार ७४० बल्क लिटर देशी-विदेशी मद्य, बिअर, वाईनची विक्री झाली आहे. तसेच या विक्रीतून १ हजार ६५५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.


जिल्ह्यात सुरु असलेल्या मद्य निर्मीती कंपन्या, मद्याच्या दुकानांमध्ये येणारे मद्य, बारमध्ये विक्रीसाठी येणारे मद्य यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग बारीक लक्ष ठेऊन असते. मागील काही वर्षांमध्ये मद्याच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम मद्य बनविणे व मद्य विक्रीवर झालेला नाही.


२०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ४ कोटी २९ लाख ६० हजार ७४० बल्क लिटर मद्य विक्री झाली आहे. यामध्ये देशी मद्य ९३ लाख ६१ हजार ७४८, विदेशी मद्य १ कोटी १२ लाख ६२ हजार २२१, बिअर २ कोटी २३ लाख ३६ हजार २७७ बल्क लिटर विक्री झाली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त झाली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx