Saturday, December 27, 2025
जिल्ह्यातील १० नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
जिल्ह्यातील १० नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले...

अलिबाग : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा मंगळवारी (दि.४) केली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांचा समावेश आहे. १० नगरपरिषदांमध्ये १० नगराध्यक्ष तसेच २१३ सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांचा कार्यकाळ २०२१ मध्ये संपुष्टात आला होता. तेव्हापासून या नगरपरिषदांवर प्रशासकीय राजवट सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य निवडणुक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रशासकीय कामाना वेग आला आहे. नगराध्यक्ष आरक्षण आणि प्रभाग आरक्षण यापुर्वीच निश्चित झाल्याने राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीचे काम सुरु केले आहे. युत्या आणि आघाड्यांची समिकरणे जुळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.


जिल्ह्यातील या नगरपरिषदांमध्ये निवडणूक

अलिबाग, खोपोली, कर्जत, माथेरान, उरण, पेण, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड.


असा असेल निवडणूक कार्यक्रम

: १० ते १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

: २१ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत

: २ डिसेंबरला मतदान 

: ३ डिसेंबरल मतमोजणी

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx