देश महाराष्ट्र
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना (शिंदे गट) उपविभागप्रमुख असणारे आबा मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मशाल हाती घेतली आहे. मातोश्री येथे हा पक्षप्रवेश समारंभ पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाण्यातील बहुतांश माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. मात्र आता यामधील काही शिवसैनिक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवसेना (शिंदे गट) उपविभागप्रमुख असणारे आबा मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, युवासेना कोपरी पाचपाखाडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx