ठाणे : दहशतवादी विरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा येथील एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. जमाती इस्लामिया या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे..
दहशतवादी विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी पुणे या ठिकाणी धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. या आरोपींची विचारपूस केल्यानंतर आरोपींनी मुंब्रामध्ये राहणारा एका शिक्षकाचा संबंध असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र एटीएसने आज मुंब्रा येथील कवसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली.
शिक्षकाच्या घरातील मोबाईल कॉम्पुटर आणि इतर सामग्री हस्तगत केली आहे. यांनतर त्याला मुंबई येथील कुर्ला येथे त्याचा दुसऱ्या घरी नेत पुढील तपास सुरू आहे. शिक्षक हा जमाती इस्लामिया या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx