Saturday, December 27, 2025
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन...

मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आज (२४ नोव्हेंबर) वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.
ऑक्टोबर महिन्यात श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही आठवड्यांच्या उपचारांनंतर १२ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरीच उपचार घेत होते. आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. शोले, फूल और पत्थर, सत्यम शिवम, चुपके चुपके, धर्मवीर, अनुपमा आणि अनेक सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले.

त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना “ही-मॅन ऑफ बॉलिवूड”, “गरम धरम” आणि “ऍक्शन किंग” अशी बिरुदं मिळाली. अभिनयाबरोबरच धर्मेंद्र हे निर्मातेही होते आणि काही काळ त्यांनी खासदार म्हणूनही काम पाहिले.
२०१२ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक भव्य अध्याय आज संपला आहे.
धर्मेंद्रजींना Desh Maharashtra कडून विनम्र श्रद्धांजली. 🕯️🙏


Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx