अलिबाग : चोंढी मारहाण प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सात वर्ष तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावलेल्या जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर व त्यांच्या २० साथीदारांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.
११ सप्टेंबर २०१२ रोजी चोंढी गावात झालेल्या वादातून काँग्रेस नेते विजय थळे, त्यांच्या पत्नी रूपाली थळे आणि इतर कार्यकर्त्यांवर हल्ला झाला होता. याप्रकरणात दिलीप भोईर यांच्यासह २५ जणांविरोधात मांडवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल जाहीर केला. यामध्ये दिलीप भोईर यांच्यासह २१ जणांना ७ वर्ष ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. तर चार जणांची निर्दोष मुक्तता केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलीप भोईर यांच्यासह साथीदारांना दिलेल्या जामिनामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पुढील न्यायालयीन प्रक्रिया आणि अंतिम शिक्षा काय ठरेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx