दिल्ली : दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ आज मोठा स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला, नागरिकांची धावपळ उडाली, स्फोटामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखंमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंगमध्ये असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला, कार जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखंमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx