Sunday, June 1, 2025
दिशा सालियन मृत्यू प्रकरण, क्लोजर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरण, क्लोजर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर...

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने पाच वर्षानंतर पुन्हा खळबळ उडवून दिले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिशा सालियनचा इमारतीवरून पडून मृत्यू नाही. तर तिची सामुहीक बलात्कारानंतर हत्या झाल्याचा आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धव घेतली असून याचिका दाखल केली आहे. तर यामध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरियो, सुरज पांचाली यांच्यासह इतरांना आरोपी करण्याची विनंती केलीय. दरम्यान आता मालवणी पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमधून अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत असून यात तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे असल्याचे म्हटंल आहे. दिशा सालियान ही आर्थिक विवंचनेत होती. सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते. तर ते एका महिलेला पैसे देत असल्याचे क्लोजर रिपोर्टमधून समोर आले आहे.


तर सतीश सालियान सतत दिशाकडे पैशांची मागणी करत असत. यामुळे ती थकली होती. याबाबत तिने अनेकदा आपल्या मित्रांनाही माहिती दिल्याचेही क्लोजर रिपोर्टमधून म्हटले आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता असून सतीश सालियान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx