Sunday, June 1, 2025
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू...

अलिबाग : अलिबाग जवळील रेवस बायपास नजीक दोन दुचाकीचा शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात मिथिल सुतार या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, संदीप म्हात्रे हा दुचाकीस्वार जखमी झाला आहे.


शुक्रवारी सकाळी  34 वर्षीय मिथिल सुतार हा तरुण पिंपळभाटकडे जात होता. दरम्यान अलिबाग जवळील रेवस बायपास नजीक असलेल्या केक शॉप जवळ आल्यावर समोरून दुसरी दुचाकी आली. या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीस्वार मिथिल सुतार याचा जागीच मृत्यू झाला. तसेच संदीप म्हात्रे हा दुसरा दुचाकीस्वार जखमी झाल्याने त्याला अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx