Sunday, June 1, 2025
दुरशेत फाट्यावर बॅगमध्ये सापडदाऊ महिलेचा मृतदेह
दुरशेत फाट्यावर बॅगमध्ये सापडदाऊ महिलेचा मृतदेह ...

पेण : मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील दुरशेत गावाच्या फाट्यावर नदीकाठी एका बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. पेण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दुरशेत परिसरात वारंवार गुन्हेगारी घटना घडत असून, याआधी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह इथे आढळला होता. त्यानंतर इथेच नदीपात्रात ३ बंदूका देखील मिळाल्या होत्या. आता एका बॅग मध्ये सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. 

सदर मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत हे करीत आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx