देश महाराष्ट्र
ऑनलाइन डेस्क : गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय संघाला ४०८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या ५४९ धावांचे लक्ष गाठताना भारतीय संघाला केवळ १४० धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावातील ४४९ धावा उभारल्या होत्या. तर भारतीय संघाचा पहिल्या डाव २०१. धावांवर संपुष्टात असा. दक्षिण आफ्रिका संघाने आपला दुसरा डाव २६० धावांवर घोषित केला. विजयासाठी ५४९ धावांचे लक्ष घेऊन उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात केवळ १४० धावा करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाने गुवाहाटी कसोटी सामना ४०८ धावांनी गमावला. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. याआधी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला नागपूरच्या मैदानात ३४२ धावांनी पराभूत केले होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx