अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील एकूण २५ जणांनी नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल केली, तर नगराध्यक्ष पदासाठी १ एक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषदांमध्ये २१७ नगरसेवक पदांसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी उरण नगरपरिषदेत सर्वाधिक १७ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्षपदासाठीही १ अर्ज सादर करण्यात आला आहे.
इतर नगरपरिषदांपैकी मुरूड-जंजिरा येथे ५, श्रीवर्धन व पेण येथे प्रत्येकी १ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. तर खोपोली, अलिबाग, रोहा, महाड, कर्जत आणि माथेरान या नगरपरिषदांमध्ये अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.
जिल्ह्यातील राजकीय हालचालींना यामुळे वेग आला असून उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षांच्या आणि आघाड्यांच्या बैठका, रणनीती ठरविण्याचे सत्रे सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व प्रमुख पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx