Saturday, December 27, 2025
प्रणव पुजारीची आयसीएनप्रो शो २०२६ साठी निवड
प्रणव पुजारीची आयसीएनप्रो शो २०२६ साठी निवड ...

अलिबाग‌ : गोवा येथे झालेल्या आयसीएन इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथिल प्रणव उमेश पुजारी याने वेगवेगळ्या कॅटॅगिरीत उल्लेखनीय कामगिरी करीत २०२६ मध्ये आयसीएनच्या वतीने होणाऱ्या शो साठी पात्रता मिळवली आहे. या त्याचा कामगिरीबद्दल गोंधळपाडा ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील बॉडीबिल्डर कडून कौतुक होत आहे.

प्रणवने बॉडीबिल्डिंग कॅटॅगिरीत तृतीय क्रमांक, पुरुष फिजिक कॅटॅगिरीत चौथा क्रमांक, पुरुष फिटनेस मॉडेल कॅटॅगिरीत सुवर्णं पदक पटकाविले. त्याने प्रो क्वालिफिकेशन स्पर्धेत ३० स्पर्धकांमधून‌ तृतीय क्रमांक पटकवला आहे. या त्याच्या कागिरीबद्दल त्याची पुढील वर्षी गोवा येथे होणाऱ्या आयसीएन शो २०२६ साठी निवड झाली आहे. प्रणवने यापूर्वी अनेक जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक बक्षीस पटकवली आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx