Wednesday, February 25, 2026
प्रशिक्षक प्रियांका गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लाठी व राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धेत अलिबागच्या स्पर्धकांचे यश
प्रशिक्षक प्रियांका गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लाठी व राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धेत अलिबागच्या स्पर्धकांचे यश...

देश महाराष्ट्र

अलिबाग : लाठी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सहावी राष्ट्रीय लाठी व दुसरी राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धा २०२६ तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आली होती. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील स्पर्धकांनी प्रशिक्षक प्रियांका गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी बजावली. स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या सर्व स्पर्धकांचे आमदार महेंद्र दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांच्यासह रायगड लाठी असोसिएशन अलिबागचे अध्यक्ष प्रमोद मसाळ यांनी अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लाठी असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित सहावी राष्ट्रीय लाठी व दुसरी राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धे महाराष्ट्र राज्यदहित अन्य सहा राज्यातील स्पर्धकांनी सहभागा घेतला होता. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील १४ स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी करीत २५ सुवर्ण पदके पटकावली.

अलिबाग मधील शिवांश निखिल पाटील याने १ सुवर्णपदक पटकाविले. तर विहान अनिकेत नाईक १ , रुद्रा अंकिता विनय पिळणकर ४, अवनी नितीन पाटील २, पर्णवी स्वप्नील नाईक २ श, अनन्या वैभव निकम २  श्लोक अतुल जाधव २, जाई योगेश धनावडे २, तीर्था योगेश धनावडे २, ओवी प्रवीणकुमार पाटील २, अवनी राजेंद्र कवळे २, आराध्या पंडित नखाते २, नम्रता गणेश चव्हाण या १ सुवर्ण पदक पटकाविले. सर्व स्पर्धकांनी एकम लाठी, द्वे लाठी, द्वि अनिखा, पंचम लाठी अशा वेगवेगळ्या लाठी खेळ प्रकारामध्ये यश संपादित केले. 

आंतरराष्ट्रीय पंच प्रियांका संदेश गुंजाळ यांच्यासह शुभम महेंद्र नखाते, वेदांत संदेश सुर्वे, माही राजेंद्र खमिस, सिद्धार्थ अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी ही यश संपादित केले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx