Sunday, June 1, 2025
बाजारात ७० टक्के पनीर बनावट?
बाजारात ७० टक्के पनीर बनावट?...

मुंबई : बाजारात ७० टक्के पनीर बनावट असल्याचा दावा भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बुधवारी सभागृहात केला आहे. बनानट पनीरच्या मुद्द्यावर आमदार पाचपुते विधानसभेत भडकले होते. त्यांनी बाजारातील बनावट पनीर आणि नैसर्गिक पनीर अध्यक्षांना दिले आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली.

आमदार विक्रमसिंह पाचपुते बनावट पनीर घेऊन विधानसभेत आले होते. तुम्ही नैसर्गिक आणि बनावट पनीर खाऊन पाहा, असे म्हणत त्यांनी ते विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले. यावेळी ते म्हणाले की, मार्केटमधील ७० टक्के पनीर हे बनावट आहे. लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे. हे तेलाचे गोळे आहेत. प्रश्न मांडल्यानंतर धाडी पडल्या. यात १५ लाख किंमतीचे बनावट पनीर पुणे व चंद्रपूरमध्ये सापडले. कायद्यात कठोर कारवाईसाठी तरतूद नाही, ही गंभीर बाब आहे. त्यासाठी खुनाचा प्रयत्नाची तरतूद करावी, अशी मागणी केली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx