अलिबाग : बोधगया महाविहारावर पूर्णपणे बौद्ध धर्मियांचे ताब्यात देण्यात द्यावे या मागणीसाठी बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा शाखेतर्फे शनिवारी (दि.८) रायगड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राज्य सचिव सूर्यकांत कासे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शिंदे , भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष विजय कृष्णा आवासकर जिल्हाध्यक्ष, बामसेफ, रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर म्हात्रे , बौद्धजन पंचायत समिती अलिबागचे परशुराम राघो ओव्हाळ, बौद्धजन पंचायत समिती अलिबाग तालुका अध्यक्ष विकास हिराजी जाधव, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पनवेलचे प्रकाश शिवराम जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
बोधगया है जगातील सर्व बौध्दांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुध्दांना संबोधी प्राप्त झाली होती. हे महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. हे पवित्र स्थळ बोधगया महाविहारावर ब्राम्हणांनी कब्जा केला आहे. ते बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे प्रमुख मागणीसाठी देशभर आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी अलिबागमध्ये देखील आंदोलन करण्यात आले.
महाबोधी टेम्पल एका ॲक्ट १९४९ बनविण्यात आला. यामुळे या महाविहारावर ब्राम्हणांचा कब्जा आहे. या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय विरासत कायद्याचेही उल्लंघन होत आहे. हा कायदा रद्द करावा व हे महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे. महाबोधी महाविहार ही बौध्दांची जागतिक विरासत आहे. १८९५ वर्षी अनागरिक धर्मपाल विरुध्द महंत या वादाचा निकाल न्यायालयाने बौध्दांच्या बाजुने दिलेला असतानाही या महविहारावर ब्राम्हणांचा कब्जा आहे. महाबोधी महाविहाराच्या जागेवर कब्जा केलेल्या महंताच्या खोलीत अद्यापही बुध्दप्रतिमा, शीलालेख, अभिलेखे आहेत. या ऐतिहासिक वास्तु पुरातत्व विभाग, बोधगया संग्रहालयात जमा करण्यात याव्या. महाबोधी महाविहाराजवळ सम्राट अशोकाचा राजवाडा होता. तो शोधण्यात यावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx