Sunday, June 1, 2025
भास्कर जाधव यांच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेतेपदाची माळ
भास्कर जाधव यांच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेतेपदाची माळ...

मुंबई : महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक २० जागा जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असून, विधानसभा अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २०, काँग्रेसला १६, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळालेल्या होत्या. या तीनही पक्षाच्या आमदारांची संख्या पन्नासच्या आतमध्येच आहे. मात्र, सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार असल्याचे संकेत महायुतीकडून मिळाल्यानंतर शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला होता.

शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची एकत्र वाटचाल सुरू राहील. विधानसभा अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी दिले आहे. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी ही विरोधी पक्षनेतेपदाची निवड व्हावी, अशी आमची मागणी आहे. लोकशाही मूल्यांचे पालन करून अध्यक्ष भास्कर जाधव यांचे नाव जाहीर करतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच अडीच वर्षांसाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही एकत्रिपणे पुढे जात आहोत. पुढे निवडणुका होत आहेत. त्या वेळी बघू, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx