ठाणे : भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. तिथीनुसार शिवजयंतीच्या म्हणजे १७ मार्च रोजी या दिनी या मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट अखंड कृष्णशीला पाषाणातून घडविण्यात आली आहे. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर शिल्प चित्र साकारण्यात आले आहे. त्याखाली त्या प्रसंगाची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आली आहे. हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, स्वामी गोविंदगिरी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिराचा भव्यदिव्य लोकपर्ण सोहळा पार पडणार आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx