मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने काँग्रेसने मनसे आणि एमआयएम या दोन्ही पक्षांसोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
नुकतीच काँग्रेसची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसने मनसेसोबत जाण्याचा एकही प्रस्ताव ठेवला नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी, मनसेची परप्रांतीय विरोधी आणि अल्पसंख्याक विरोधी भूमिका ही पक्षाच्या धर्मनिरपेक्ष धोरणांशी विसंगत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करणे शक्य नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
मनसेबद्दलच्या भूमिकेवर वारंवार पक्षाचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत. पण मनसे सोबत नाही. राज ठाकरे यांच्या मनसेला महाविकास आघाडी सामील करून घेण्याचा किंवा त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही. धोरणात्मक युतीबद्दलचा अंतिम निर्णय काँग्रेसची राष्ट्रीय हायकमांड घेईल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx