देश महाराष्ट्र
महाड : महाड नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात एकमेकांच्या कार्यकर्त्यांना मारहाण तसेच गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
मंगळवारी महाड नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेना (शिंदे गट) आमदार भारत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे एक मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सुशांत जाबरे यांनी केला व त्यांनी विकास गोगावले यांच्या मतदान केंद्रात जाण्यावर आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.विकास गोगावले यांनी जाबरे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची चर्च आहे. तसेच या राड्यात काही गाड्यांची तोडपोडही करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, महाडमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx