Saturday, December 27, 2025
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेतील सामन्यांचे रायगड जिल्ह्यात होणार आयोजन
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेतील सामन्यांचे रायगड जिल्ह्यात होणार आयोजन...

अलिबाग :  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या अंतरजिल्हा व नामांकित क्रिकेट क्लब यांच्या मधील होणाऱ्या निमंत्रित (इंव्हिटशन ट्रॉफी) दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पंधरा सामन्यांचे आयोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध मैदानावर ८ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यात करण्यात येणार आहे, एमसीए इन्व्हिटेशन ट्रॉफी स्पर्धेतील १५ सामन्यांचे आयोजन रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स रसायनी पाताळगंगा, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उलवे पनवेल ह्या मैदानांवर करण्यात येणार असून सामन्यांचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी आरडीसीएचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी प्रसार माध्यमांना दिली.

रायगड जिल्ह्यात सातत्यानं एमसीएच्या मॅचेस होत असल्याचा आपल्याला आनंद आहे व त्यासाठी आपण एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार सचिव ॲड. कमलेश पिसाळ, सदस्य सुशील शेवाळे, स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष राजू काणे, सिईओ अजिंक्य जोशी व सर्व पदाधिकारी,सदस्यांचे आभार मानत असल्याचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. 

स्पर्धेतील १५ दोन दिवसीय सामने रायगड मध्ये होणार असून ग्रुप \"ई\" मध्ये हिंगोली, सातारा, बीड, वायएमसीए क्रिकेट क्लब, ट्रिनिटी क्रिकेट क्लब, साऊथ झोन अशा सहा संघांमध्ये साखळी फेरीतील सामने खेळले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे येथे गेल्या महिन्यात बीसीसीआय आयोजित कूच बिहार ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा हा एकोणीस वर्षाखालील मुलांचा चार दिवसीय सामना देखील आरडीसीए तर्फे यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात सातत्याने बीसीसीआय व एमसीएच्या वरच्या स्तराच्या मॅचेस तसेच जिल्हा अंतर्गत होणाऱ्या विविध अकॅडमी व क्लबच्या मॅचेस होत असल्याने जिल्ह्यात लेदर बॉल क्रिकेटला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळताना दिसत आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx