Saturday, December 27, 2025
महिला क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिका संघ अंतिम फेरीत दाखल
महिला क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिका संघ अंतिम फेरीत दाखल ...

ऑनलाईन डेस्क : महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सेमिफायनल‌ सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंड संघाचा पराभव‌ करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कर्णधार लॉराच्या विक्रमी शतकाच्या जोरावर ३१९ धावा करत इंग्लंडच्या संघासमोर ३२० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४२ व्या षटकात १९४ धावांवर आटोपला.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या लॉरानं १४३ चेंडूत २० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १६९ धावांची खेळी केली. तिने ब्रिट्सच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची दमदार भागीदारी रचली. सलामीची बॅटर ६५ चेंडूत ४५ धावा करून परतल्यावर मेरीझान कॅप ४२ आणि क्लोई ट्रायॉन यांनी ३३ केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धावफलकावर ३१९ धावा लावल्या.

इंग्लंडच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली, परंतु कर्णधार नॅट सेव्हियर ब्रंट आणि अॅलिस कॅप्सीने चौथ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या आशा काही काळ जिवंत ठेवल्या. तथापि, कॅप्सी ५० धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंड पूर्णपणे कोसळले. कर्णधार ब्रंटने ६४, डॅनी वायटने ३४ आणि लिन्सी स्मिथने २७ धावा केल्या. संपूर्ण संघ ४२.३ षटकांत १९४ धावांवर बाद झाला.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx