देश महाराष्ट्र
माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगावजवळ कळमजे परिसरात बुधवारी (दि.२६) सकाळी भीषण अपघात झाला. शिवशाही बस आणि सीएनजी सिलिंडर वाहून नेणारा ट्रक यांच्या धडकेत बसमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसाने महामार्गावरील वाहतूक थांबवली असून, यामुळे परिसरात वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.
अपघातग्रस्त बस मुंबईहून मालवण ला जात होती. अपघातात शिवशाही बसच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले असून जोरदार धडकेमुळे ट्रकमधून सीएनजी गॅस गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही अनहोनी टाळण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवली. वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी गळतीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx