Wednesday, February 25, 2026
रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसैनिक करणार भीक मागो आंदोलन...

अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, काहींना अपंगत्व आले आहे. रस्त्यांच्या या दुरावस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ दिवसात रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भीक मागो‌ आंदोलन करून, आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेले पैसे हे सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्यासाठी देण्यात येणार आहेत. याबाबत शिवसैनिकांनी आपल्या भावना देश महाराष्ट्र प्रतिनिधीसमोर मांडल्या........

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx