Sunday, June 1, 2025
राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश
राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश...


Rajan Salvi Breaking News Today : कोकणातील राजापूर विधानसभेत माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता कोकणात एकनाथ शिंदेंची
ताकद वाढली आहे.


आधी दिला राजीमा, आज शिवसेनेत प्रवेश

राजन साळवींनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. “मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे” असे राजन साळवींनी म्हटलं आहे. शिवसेनेत २०२२ ला सर्वात मोठी फूट पडली. त्यावेळी राजन साळवी हे उद्धव ठाकरेंबरोबरच होते. मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे हे माझे राजकीय गुरु आहेत असं म्हणत हातातलं शिवबंधन तोडून टाकलं आहे. तसंच हाती धनुष्य-बाण घेतला आहे.


Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx