मुंबई : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत महायुतीमध्ये घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना पक्षाचे काही मंत्री वेगवेगळ्या कारणावरून नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असूनही शिंदेंचे मंत्री सोमवारी (दि.१८) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले.
सोमवारी (18 नोव्हेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीला सामान्यत: सरकारमधील सर्वच मंत्री उपस्थित असतात. परंतु आजच्या बैठकीला शिवसेनेचे सर्वच मंत्री अनुपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र शिवसेनेचा एकही मंत्री बैठकीला नसल्यामळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx