अलिबाग : पेण अलिबाग राज्यमार्गावरील कार्लेखिंड येथे डोंगरमाथ्यावर रस्त्याच्या कडेला लघुशंकेला गेलेला एक पर्यटक तोल जाऊन दरीत कोसळल्याची घटना घडली. हरिश्चंद्र गोसावी असे पर्यटकाचे नाव असून, तो पुणे येथील राहणार आहे. पोलिसांनी गोसावी याला दरीतून बाहेर काढले असून, परहुर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान हरिश्चंद्र गोसावी यांनी मद्यपान केले असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे येथून हरिश्चंद्र गोसावी हे चारचाकी वाहनाने आपल्या मित्रांसह अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. येथील पर्यटनस्थळे पाहून झाल्यानंतर त्यांनी मद्यपान केले. यांनतर रविवारी सायंकाळी सर्वजण पुणे येथे परत जाण्यास निघाले. यावेळी अलिबाग पेण राज्यमार्गावरी
संध्याकाळच्या सुमारास हरिश्चंद्र गोसावी हे आणि त्याचे मित्र पुणे येथे जाण्यासाठी निघाले होते. कार्लेखिंड या घाट रस्त्यात गाडी थांबवून गोसावी लघुशंका करण्यासाठी किनारी गेले. यावेळी त्यांचा तोल जावून ते दरीत कोसळले.
हरिश्चंद्र गोसावी हे दरीत कोसळले असल्याने त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी वाचविण्यासाठी तेथून जाणाऱ्या नागरिकांकडे मदत मागितली. तेथे जमलेल्या एका नागरिकाने तात्काळ वाहतूक कर्मचारी यांना संपर्क साधला. वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांची मदत घेत अर्धा पाऊण तासाच्या अथक प्रयत्नाने हरिश्चंद्र गोसावी यांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढले आणि ताबडतोब त्यांना परहुर येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यांनतर गोसावी यांना पुणे येथे उपचाराकरिता नेले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx