Sunday, June 1, 2025
लाचखोर ग्रामपंचायत अधिकारी जेरबंद
लाचखोर ग्रामपंचायत अधिकारी जेरबंद...

अलिबाग : घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पेण तालुक्यातील मळेघर ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर जाधव यांच्या मुसक्या नवी मुंबई लाच प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.११) आवळल्या आहेत. 


मळेघर येथील एका इसमाला कोर्टाचे कामकाजासाठी तसेच एम.एस.ई.बी. कार्यालयात सादर करण्यासाठी घराच्या असेसमेंट उताऱ्याची गरज होती. त्यानुसार सदर इसमाने १७ मार्च रोजी ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. सदर असेसमेंट मिळावा यासाठी इसमाने १० एप्रिल रोजी वकिलांना कुलमुक्त्यार पत्र तयार करून दिले. त्यानुसार वकिलांनी १० एप्रिल रोजी ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर जाधव यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधला. यावेळी परमेश्वर जाधव यांनी वकिलांकडे सदर कामासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे वकिलांनी नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 


सदर तक्रारीची शहानिशा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा रचित परमेश्वर जाधव याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर सापळा नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने केली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx