अलिबाग : मांडवा, भग आणि धोकावडे येथून नोकरीच्या शोधात शहरात गेलेले तरुण पुन्हा अलीबागकडे वळू लागले आहेत. कारण मांडव्यात सुरु असलेल्या लोढा ग्रुपच्या मोठ्या बांधकाम प्रकल्पात स्थानिक तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या आहेत.
धोकोवडे गावचा ऋषिकेश गावंड सध्या लोढा ग्रुपच्या मानव संसाधन (एचआर) विभागात डेप्युटी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्याने व्यवस्थापनाचाही अभ्यास केला. त्यानंतर तो ठाण्याला नोकरीसाठी गेला. मात्र लोढा अलीबागमध्ये संधी मिळाल्याचे कळताच त्याने ती लगेच स्वीकारली, \\\'ठाण्यात माझ्याकडे चांगली नोकरी होती, पण सतत घरी जाण्याची ओढ वाटायची. आता मला आवडते कामही करता येते आणि कुटुंबासोबत राहण्याची संधीही मिळते,\\\" असे ऋषिकेशने सांगितले.
अजय म्हात्रे है दूसरे उदाहरण. ते इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून, आतापर्यंतच्या सगळ्या नोकऱ्या मुंबई आणि नवी मुंबईतच होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लोढामध्ये असिस्टंट साइट इंजिनीयर म्हणून जॉईन केले. \\\"माझ्या आधीच्या कंपनीने मला ३० टक्के अधिक पगार देण्याची ऑफर दिली होती. पण मी आईवडिलांसोबत राहण्यासाठी अलीबाग गाठले. आता मला कामही आवडते आणि प्रवासाचा वेळही फारसा लागत नाही,\\\" असे त्यांनी सांगितले.
सध्या लोढा अलीबाग प्रकल्पात डझनभर कर्मचारी आसपासच्या गावांमधून आलेले आहेत. \\\"मुंबईतील एका मोठ्या कंपनीत सात वर्षे काम केल्यानंतर जेव्हा मला माझ्याच गावात लोढामध्ये नोकरी मिळणार असल्याचे कळले, तेव्हा मी फार उत्साही झालो. आता कामही आनंदाने करता येते आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतो,\\\" असे जिग्नेश पाटील यानी सांगितले. ते सध्या लोढामध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह आहेत.
पावसाळ्यानंतर लोढा अधिक अभियंत्यांची भरती करणार असून, स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. \\\"आम्ही स्थानिक समुदायाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. अलीबाग प्रकल्पासाठी स्थानिक तरुणांचे बायोडेटा मिळावेत म्हणून आम्ही गावांमधील काही नेत्यांशी संपर्क साधला आहे. प्रकल्पात कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे लोढा डेव्हलपर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx