Sunday, June 1, 2025
वरंध घाटात एसटी पलटल्याने १८ प्रवासी जखमी
वरंध घाटात एसटी पलटल्याने १८ प्रवासी जखमी...

महाड : महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड  बस क्रमांक एम.एच. २० बी.एल. ३८२२ या एसटीला शनिवारी (दि.१५) महाडच्या दिशेने परतत असताना वरंध घाटात बेबीचा गोल  ठिकाणी अपघात होऊन ही बस पलटली. या अपघातात जवळपास १८ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यामध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तरी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती एसटी चालकाकडून प्राप्त झाली, दरम्यान ही बस एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx