Sunday, June 1, 2025
विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर झेप घेणाऱ्या अंजली वाघ या विद्यार्थिनीचा सत्कार
विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर झेप घेणाऱ्या अंजली वाघ या विद्यार्थिनीचा सत्कार...

अलिबाग, दि.१७ (प्रतिनिधी) :
शालेय विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर भरारी घेणाऱ्या कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा, झुगरेवाडी येथील विद्यार्थिनी अंजली भास्कर वाघ हिचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सोमवारी (दि.१७) सत्कार केला. यावेळी डॉ. भरत बास्टेवाड यांनी अंजली हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


रायगड जिल्हा परिषद शाळा, झुगरेवाडी येथे आठवीत शिकणारी विद्यार्थिनी अंजली भास्कर वाघ हिने शालेय विज्ञान प्रदर्शनात रस्ते सुरक्षा विषयावर प्रकल्प सदर केला होता. या प्रकल्पाला तालुका स्तर तसेच जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त झाला. यांनतर या प्रकल्पाची निवड राज्य स्तरावर करण्यात आली होती. एका दुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केलेल्या प्रकल्पाने राज्य स्तरापर्यंत झेप घेतली. यामुळे डॉ. भरत बास्टेवाड यांनी अंजली वाघ हिचा सत्कार केला. तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थी वेदांत म्हात्रे याचा सत्कारही करण्यात आला. वेदांत हा ढोलकी व पखवाज वादक आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, झुगरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे, शिक्षक सतीश घावत यांच्यासह भास्कर वाघ उपस्थित होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx