Sunday, June 1, 2025
वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने आमदार निवासातील एका व्यक्तीचा मृत्यू
वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने आमदार निवासातील एका व्यक्तीचा मृत्यू ...

मुंबई : राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, त्या मंत्रालयाच्या जवळ असणाऱ्या आमदार निवासातही वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आमदार निवासातून फोन केल्यावरसुद्धा रुग्णावाहिका वेळेत आली नाही. त्यामुळे आमदार निवासात राहणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला.


राज्यात सध्या पुणे येथील दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार गाजत आहे. त्यानंतर आता मंत्रालय शेजारी असणाऱ्या आमदार निवासातून फोन गेल्यावरसुद्धा रुग्णवाहिका मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आकाशवाणी येथील आमदार निवासात ४०८ क्रमांकाची खोली आमदार विजयकुमार देशमुख यांना दिली आहे. त्यांच्या खोलीत सोलापूरमधील चंद्रकांत धोत्रे राहत होते. त्यांना रात्री १२.३० वाजता ह्रदयविकारच्या वेदना सुरु झाल्या. त्यामुळे रुग्णावाहिकेला वारंवार फोन करण्यात आले. त्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. शेवटी पोलिसांना फोन करावा लागला. पोलिसांच्या गाडीतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx