अलिबाग : साहित्यसंपदा प्रकाशित \'शब्द माझे तुझ्याचसाठी\' या कवयित्री अश्विनी सचिन बोलके यांच्या स्वरचित काव्यसंग्रहाला शुभंकरोती साहित्य परिवाराच्या राज्यस्तरीय संमेलनात पुस्तक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ तसेच ज्येष्ठ गझलकार ऎ. के. शेख यांच्या हस्ते अश्विनी बोलके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील वीर सावरकर अध्यासन केंद्र येथे शुभंकरोती साहित्य परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. यामध्ये विविध पुरस्कार, परिसंवाद, मुलाखत, काव्यस्पर्धा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. समूह संस्थापिका सोनाली जगताप, प्रशासिका डॉ. माया यावलकर, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यावेळी उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx