Wednesday, October 29, 2025
शिंदे गटाच्या आमदारांना रोखण्यासाठी तटकरेंची राजकीय खेळी
शिंदे गटाच्या आमदारांना रोखण्यासाठी तटकरेंची राजकीय खेळी...

अलिबाग : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिंदे गट यांच्यात बेबनाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार असलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघात आपला पक्ष बळकट करण्यावर भर देत, शिंदे गटाच्या आमदारांना धोबीपछाड करण्याची रणनीती वापरात आणली आहे. काही दिवसांपूर्वी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या सुधाकर घारे यांच्या खांद्यावर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी तटकरे यांनी दिली होती. यानंतर शनिवारी (दि.२) महिडचे शिंदे गटाचे आमदार तथा रोहयो मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते ऍड. राजीव साबळे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार असणाऱ्या अलिबाग मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र ऍड. प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या करुन घेतला. यामुळे शिंदे गटाच्या आमदारांसमोर तटकरे यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीचे आव्हानच उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून येते.


राज्यात भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. सत्तास्थानेपनंतर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ पडली. मात्र या निर्णयाला शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला. यांनतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणखीनच वाद सुरू असून, दोन्ही बाजूकडून वारंवार एकमेकांची उनिधुनी काढण्यात येत आहेत.


सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे आमदार असणाऱ्या तीनही मतदारसंघात त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यापाठी राजकीय ताकद उभी करून त्यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड केली होती. घारे हे महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.


तर सोमवारी सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे महाडचे आमदार राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावले यांना जोरदार धक्का दिला. गोगावले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ऍड. राजीव साबळे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. ऍड. राजू साबळे यांच्यासोबत माणगाव शहरातील तसेच तालुक्यातील माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्यासह शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. सुनील तटकरे यांच्या या खेळीने गोगावले यांना धोबीपछाड मिळाला आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


कर्जत, महाड पाठोपाठ अलिबाग विधानसभा मतदारसंघातही  तटकरे यांनी आपला पक्ष मजबूत करण्याचे धोरण अवलंबले आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत. येथे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र ॲड. प्रवीण ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तटकरे यांनी अलिबागआतदारसंघातही आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत असून, या माध्यमातून आमदार दळवी यांना एकप्रकारे  इशाराच दिला असल्याचे दिसून येते.


Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx