Saturday, December 27, 2025
शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा वचननामा जाहीर
शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा वचननामा जाहीर ...

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे श्वेता पालकर व संदिप पालकर निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत असून, शिवसेना उमेदवारांनी आपला विकासाचा वचननामा प्रकाशित केला आहे. वचननाम्याच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन मतदारांना देण्यात आले आहे. तसेच मागील काही वर्षांमध्ये उमेदवारांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा ऊहापोह वचननाम्यात करण्यात आला आहे.

अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर ३० नोव्हेंबरपर्यंत प्रचार करण्याची मुदत उमेदवारांना देण्यात आली आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवार रॅली तसेच घरोघरी जावून आपला प्रचार करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच निवडून आल्यानंतर आपण कोणती विकासकाने करणार यासाठी उमेदवार आपले वाचनाने प्रसिद्ध करीत आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार श्वेता पालकर व संदिप पालकर यांनी आपला वचननामा प्रकाशित केला आहे. 

या वचननाम्यात अलिबाग नगरपरिषदेने सन १९७४ श्रीबाग क्षेत्र विकास योजना भूखंड पाडून विकसित केली. पण आज पर्यंत ज्या भूखंड धारकांनी प्लॉट खरेदी केले त्यांच्या नावाचा स्वतंत्र ७/१२ तयार झालेला नाही. हे ४० वर्षांपासून प्रलंबीत असलेले काम पूर्ण करण्याचे प्रमुख आश्वासन देण्यात आले आहे. तसेच गटारांची पुनर्रचना करून दर्जेदार पुनर्बाधणी करणार, दर्जेदार रस्ते उभारणार, प्रभागात उभारण्यात येणारे क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत असून क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करून खेळांडूना क्रीडा संकुल खुले करून देणार, प्रभागातील नागरिकांना अल्पदरात रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार, मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार, महिला व युवक यांना रोजगार मिळवून देणार, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रभागातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणार ही आश्वासने वचननाम्याच्या माध्यमातून श्वेता पालकर व संदिप पालकर यांनी दिली आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx