श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. बिबट्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या एका बऱ्यावर हल्ला करून ठार मारून खिडकीतून बाहेर फेकून फडशा पाडल्याची घटना कारिवणे ( वरची वाडी ) येथे घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कारिवणे ( वरची वाडी ) येथिल केशव राजाराम जोशी यांच्या गोठ्यात त्यांच्याच मालिकीची गुरे व बकऱ्या २३ डिसें रोजी बांधलेली असताना मध्यरात्री च्या सुमारास बिबट्याने गोठ्याच्या खिडकीतून शिरकाव करून त्याने बांधलेल्या मोठ्या बोकडावर हल्ला करून ठार केले आणि खिडकीतून बाहेर काढत शरीराचे अनेक लचके तोडले. पहाटेच्या वेळेस बकऱ्या गुरे सोडण्यास गोठ्यात केशव जोशी हे गेले असता त्यांना शेण शेण टाकण्याच्या गोठ्याच्या खिडकीतून फेकलेला मृत बकरा बाहेरच्या बाजूस खिडकीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
बिबट्याने हल्ला करून मारलेल्या बकर्याची माहीती
जोशी यांनी ग्रामस्थांच दिली व घटना निर्शनास आणून दिली. त्यानंतर श्रीवर्धन येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून घटनास्थळी बोलविण्यात आले. यानंतर घटना स्थळी वनपाल थळे यांनी पोहचून पंचनामा करण्यात आलेला आहे. मात्र या परीसरात मानवी वस्तीचे गावं आहेत त्याच प्रमाणे लगतच असलेल्या हरीहरेश्वर - आंबेत महाड हा मार्ग असल्यामुळे येथूनअनेक पर्यटकांची रहदारी असते . मात्र वेळोवेळी बिबट्याच्या पाळीव जनावरांवरील हल्ल्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याची दहशत निर्माण पाहायला मिळत असून नागरीक भयबित अवस्थेत आहेत. याबाबत वनविभागाचे श्रीवर्धन येथील अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी थळे यांच्याजवळ संपर्क करून माहीती देण्यात आली असून या बाबत कोणती कारवाई केली जाईल याकडे नागरीकांचे लक्ष वेधून राहीले आहे .
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx