दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला पुढील सरन्यायाधीश निवडावे लागणार आहेत. बीआर गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस केली आहे.
नियमांनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये सरन्यायाधीशांनंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश हे हे पद भूषवत असतात. यासाठी सध्याचे सरन्यायाधीश नावाची शिफारस करत असतात. आता सीजेआय बी.आर. गवई यांनी नवीन सरन्यायाधीश कोण असतील याची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश भूषण गवई हे सोमवारी नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx