ऑनलाइन डेस्क : अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांचे स्पेस कॅप्सूल मेक्सिकोच्या आखातात उतरले. सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेले होते. आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकात दोघेही आठ दिवस संशोधन करून परतणार होते. मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकातच घालवावे लागले.
विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने मोहीम आखली. स्पेसएक्सच्या अवकाशयानाने १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं आणि आज पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतलं.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx