रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ भरत बास्टेवाड यांनी प्रशासकीय जबाबदारी घेतल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये स्वच्छता अभियान गतिमान करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रत्येक 15 दिवसाला गट विकास अधिकारी यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हा विषय प्रथम प्राधान्याचा ठेवल्याने गावपातळीवर देखील अभियान गतिमान झाले. स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 मध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनास प्राधान्य देण्यात आले असून, त्यानुसार ग्रा.प हद्दीत कंपोष्ट पिट, लीचपिट, प्लास्टिक संकलनासाठी पिंजरे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे प्लास्टिक संकलन केंद्राची उभारणी व गोबरधन प्रकल्प या स्वच्छता सुविधांमुळे आता गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात व माझी वसुंधरा अभियानात, स्मार्ट ग्राम योजना मध्ये चमकदार कामगिरी करण्यात स्वच्छता अभियानातील हे घटक महत्वाचे ठरत आहेत.
हागणदारीमुक्त ग्रामपंचायती व मॉडेल व्हिलेज
जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमध्ये १ हजार ८३० गावे आहेत त्यापैकी १ हजार १७६ गांवामध्ये स्वच्छता सुविधा निर्माण झाल्यामुळे मागील दिड वर्षात हि गावे मॉडेल व्हिलेज झाली आहेत. पात्र लाभार्थ्यांची ५ हजार ४३० वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. तर ३ हजार ९९६ पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन पर अनुदान वितरीत करण्यात आले आहे. बाजारहाट व गर्दीची ठिकाणे अश्या जागेवर १७९ ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत.
समुद्र किनारा स्वच्छता मोहीम
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्यातील अनेक गावे समुद्र किनाऱ्यावर वसली आहेत. स्वच्छता हि सेवा अभियानाच्या माध्यमातून, अलिबाग तालुक्यातील नागाव, वरसोली, मांडवा, रेवदंडा हे समुद्र किनारे तसेच श्रीवर्धन मधील दिवेआगर, हरिहरेश्वर, तर उरण तालुक्यातील घारापुरी, तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, बोलीं, आगरदांडा समुद्र किनारे विशेष स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ करण्यात आले. यामध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, एन.जी.ओ. व एन.एस.एस. विध्यार्थी कंपन्यांचे प्रतिनिधी, शालेय विध्यार्थी, महिला बचत गट, सरपंच सदस्य, ग्रामस्थ यांचा सहभाग घेण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वरसोली, नागाव व आवास समुद्र किनारी कचरा संकलन करण्यासाठी जर्मन बनावटीच्या तीन अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा उपयोग किनारा स्वच्छतेसाठी ग्रामपंचायती करतात.
मंदिरे स्वच्छता मोहीम
जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी तसेच गावांचे सरपंच व सदस्य व ग्रामस्थ, युवक मंडळे यांच्या सक्रीय सहभागातून विशेष मोहीमे मध्ये जिल्ह्यातील प्रमुख मंदिरामध्ये लोकसहभागातून मंदीर व परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जमा झालेला कचरा पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला आहे.
विविध अभियानातून स्वच्छत्ता समृद्धी
केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आदेशानुसार स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा-सुका निळा अभियानातून गृह भेटो स्वच्छतेचे काम स्वच्छ बचत गटांसोबत अभियानातून गृह भेटीद्वारे जनजागृती, स्वच्छ माझे अंगण अभियानातून स्वच्छता सुविधांचा वापर, स्वच्छता हि सेवा अभियानातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, स्वच्छता ग्रीन लौफ रेटिंग सिस्टीम अभियान च्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागिल ५२८ हॉटेल रिसोट्र्स ना स्वच्छता मानांकने देण्यात आली आहेत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अमलबजावणी
स्वच्छ सुजल गाव हि अभियाने गावपातळीवर यशस्वी होण्यासाठी जिल्हा स्तरावरून विशेष नियोजन केल्याने जिल्ह्या स्वच्छतेत अग्रेसर आहे. एन.जी.ओ.एन.एस.एस. तसेच सी.एस. आर. कंपन्या सहभाग प्लास्टिक संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था. एन.एस.एस विध्यार्थी, सी.एस. आर. चा वापर करणा-या औद्योगिक कंपन्या यांच्या सहभागातून गावागावात स्वच्छतेविषयी जनजागृती प्रशिक्षण, श्रमदानातून प्लास्टिक व्यवस्थापन करण्यात येत असल्याने अनेक गावे स्वच्छ सुंदर पर्यावरण युक्त होण्यास मदत होत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx